Latest Marathi News

BREAKING NEWS

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय!

0 288

 

Jawale Jewellers

मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बाजी मारली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. ऋतुजा यांना तब्बल 66 हजार 247 मतं मिळाली आहेत. त्यांच्यापाठोपाठ दुसरा नंबर नोटाचा आहे. ‘नोटा’ला तब्बल 12 हजार 776 इतकी मतं मिळाली आहे.

 

Manganga

19 व्या फेरीअंती एकूण मतमोजणी
ऋतुजा लटके – 66 हजार 247
बाळा नाडार – 1 हजार 506
मनोज नायक – 888
मीना खेडेकर – 1 हजार 511
फरहान सय्यद – 1 हजार 087
मिलिंद कांबळे – 614
राजेश त्रिपाठी – 1 हजार 569
नोटा – 12 हजार 776
एकूण मतमोजणी – 86198

 

दरम्यान, ऋतुजा लटके यांनी विजय मिळवताच, प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल शिवसैनिकांनी अंधेरीसह मुंबईतील ठिकठिकाणी फटाके फोडून तसेच पेढे वाटून जल्लोष केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.