Latest Marathi News

BREAKING NEWS

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर झाले आई-बाबा: कपूर- भट्ट परिवारात नवीन पाहुण्याचे आगमन!

0 226

 

Jawale Jewellers

मुंबई :आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-बाबा झाले असून त्यांच्या घरी इवल्याश्या परीने जन्म घेतला आहे. आलिया भट्टने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत आपल्या प्रेग्नेंसीची न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती.

 

Manganga

माहितीनुसार, रविवारी सकाळी 7 वाजता रणबीर कपूर आलियाला घेऊन हाॅस्पिटलमध्ये पोहचला होता. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. यामुळे एक अंदाज लावला जात होता की, आजच आलिया बाळाला जन्म देणार. आलिया आणि रणबीरनंतर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आलियाची सासू अर्थात नीतू कपूरही पोहचल्या होत्या.

 

दरम्यान, आलिया आई झाल्याची बातमी कळाल्यापासून चाहते सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरला शुभेच्छा देत आहेत. आलिया भट्ट आणि बाळाची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. आता चाहते आलियाच्या मुलीचा फोटो पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.