Latest Marathi News

BREAKING NEWS

श्रीलंकेच्या ‘या’ फलंदाजावर लैंगिक बलात्काराचा आरोप; पोलिसांनी केली अटक!

0 392

मुंबई: श्रीलंका टीमचा विस्फोटक फलंदाज धनुष्का गुनातिलका याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. धनुष्काला ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथून अटक करण्यात आली आहे. रविवारी श्रीलंकेचा संघ धनुष्का शिवाय मायदेशी परतला आहे.

 

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहिती अशी कि, एका २९ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून सिडनी पोलिसांनी धनुष्काला ताब्यात घेतलं आहे. महिलेने आरोप केला आहे की, गुणथिलकाने घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या महिलेने ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे अनेक दिवस दनुष्का गुनाथिलकाशी चॅट केले होते. बुधवारी दोघांची भेट झाली होती. त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. श्रीलंकेच्या टीमने शनिवारी इंग्लंडविरोधात वर्ल्डकपमधील अखेरचा सामना खेळला होता.

Manganga

 

दरम्यान, या मॅचनंतर काही वेळातच पोलिसांनी धनुष्काला अटक केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.