Latest Marathi News

BREAKING NEWS

भूकंपग्रस्त भागातील नागरिकांवर ‘हा’ अन्याय करणारा शासकीय आदेश रद्द करा; ‘यांची’ मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0 147

लातूर -भूकंपग्रस्तांना दिलेल्या आरक्षणाचे उद्दिष्ट साध्य झालेलं नसताना त्यांची पदे ५ टक्के वेगळे आरक्षण असलेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी वापरण्याचा निर्णय भूकंपग्रस्त भागातील नागरिकांवर अन्याय करणारा असल्याची भूमिका घेत सदरील शासकीय आदेश रद्द करण्याची मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेत एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, भूकंपग्रस्त पात्र उमेदवार न मिळाल्यास भूकंपग्रस्त संवर्गातील पदे प्रकल्पग्रस्तांसाठी वापरले जातील, असा शासकीय आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला. लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील अनेक गावे भूकंपग्रस्त आहेत. भूकंपग्रस्तांना दिलेल्या आरक्षणाचे उद्दिष्ट साध्य झालेलं नसताना त्यांची पदे ५ टक्के वेगळे आरक्षण असलेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी वापरण्याचा निर्णय भूकंपग्रस्त भागातील नागरिकांवर अन्याय करणारा असल्याची बाब असल्याची भूमिका घेत सदरील शासकीय आदेश रद्द करण्याची मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Manganga

 

दरम्यान, यावर मुख्यमंत्र्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.