Latest Marathi News

BREAKING NEWS

मविआचे 12 ते 13 आमदार शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात?

0 278

मुंबई: महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला. अशातच चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसमधील 22 आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला त्यानंतर आता महाविकास आघाडीतील 12 ते 13 लोकं शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा मोठा गौप्यस्फोटच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

 

Jawale Jewellers

उदय सामंत म्हणाले, “तसेच राज्यात मध्यावधी निवडणूक लागण्याची कोणतीही शक्यता नाही. उलट महाविकास आघाडीमधील 12 ते 13 लोकं शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. 170 हा आकडा भाजप आणि शिंदे यांच्याकडे आहे.असा दावा सामंत यांनी केला.

Manganga

 

याशिवाय, महाविकास आघडीत काय आलबेल आहे ते आज पुढे आले. सध्या लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आलो त्यावेळी खोके घेतले होते का? असा उलट प्रश्नही उदय सामंत यांनी यावेळी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.