Latest Marathi News

BREAKING NEWS

राष्ट्रवादीच्या शिबिरात अजितदादा अनुपस्थित: “…. गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून रहा रे. कूछ तो गडबड हैं”

0 583

मुंबईः गंभीर आजारपण असतानाही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मंथन शिबीरात यांनी उपस्थिती लावली. परंतु, यापेक्षाही जास्त लक्ष वेधून घेतले ते अजित पवार यांच्या अनुपस्थितीने. हाच मुद्दा पकडत मनसे नेते गजानन काळे यांनी एक मोठे ट्विट केले आहे.

 

Jawale Jewellers

गजानन काळे ट्विट करत म्हणाले, ‘आदरणीय पवार साहेब तब्येत ठीक नसतांना राष्ट्रवादीच्या शिबिरात येतात व अजितदादा बरोबर त्याच वेळी वैयक्तिक कारण सांगून अनुपस्थित राहतात. ही बाब काही पचनी पडत नाही. तसेही दादा विरोधी पक्षनेते म्हणून शांत आहेत काही दिवसांपासून…. गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून रहा रे. कूछ तो गडबड हैं, असे गजानन काळे यांनी ट्विट केले आहे.

Manganga

 

दरम्यान, शिबिरात 81 वर्षांचे शरद पवार एवढे आजारी असताना शिबीरात पोहोचले अन् अजित पवारांना एखादा कार्यक्रम पुढे-मागे का करता आला नाही, हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.