Latest Marathi News

BREAKING NEWS

एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट: “भविष्यात कोणतेही गट एकत्र येऊ शकतात”!

0 367

जळगाव: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठे विधान केले आहे.

 

Jawale Jewellers

गुलाबराव पाटील म्हणाले, “अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गटाची भविष्यात आघाडी होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीत राजकारण असू शकत नाही. सुख दुःखात एकमेकांकडे जाणे हे राजकारणाच्या पलिकडचे विषय असतात. मात्र भविष्यात कोणतेही गट एकत्र येऊ शकतात, असे सूचक विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.