नंदुरबार: जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात कांद्याने भरलेला ट्रकचा अपघात झाला. यात चालकाचा मृत्यू झाला तर सहचालक गंभीर जखमी झाला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मालेगाव कडून राजस्थानकडे कांदे भरून जात असलेला ट्रक तीव्र उतारावर ब्रेक फेल होऊन अनियंत्रित झाल्याने ५० फुट खोल घाटात कोसळला. यात ट्रक डिव्हायडरचा तुटलेला भागाला ठोकला गेला. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूतील गावकरी मदतीला धावून आले. स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या सहाय्याने चालक व सहचालकला बाहेर काढले. परंतू यात चालकाचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले आहे.