अकोला: अकोल्यात वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एका निर्दयी बापाने अंत्यसंस्कार न करताच मृत स्त्री जातीचे अभ्रक रस्त्यावर फेकून दिल्याची घटना घडली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये जन्मतःच प्रकृती गंभीर असलेल्या तीन दिवसांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी डॉक्टरांनी चिमुकलीचा मृतदेह पित्याच्या ताब्यात दिला, पण बापाने अंत्यसंस्कार न करताच तिला रस्त्यावर फेकून दिले. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आवार भिंतीजवळ अर्भक आढळून आले.

दरम्यान, या घटनेची माहिती, पोलिसांना मिळताच त्यांनी सुरक्षारक्षक आणि डॉक्टरांच्या मदतीने अर्भकाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासात ते स्त्री जातीचे अभ्रक असून ते मृत असल्याचे सांगण्यात आले. व पोलिसांनी ज्ञानेश्वर डोरळे रा.यवतमाळ जिल्हा याला ताब्यात घेतले. व त्यानंतर त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांसमोर मांडला. त्या मृतदेहावर पोलिसांच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.