“….उलट उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिली”: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य!
मुंबई: ‘शिंदे गटाने उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली असती, असा गौफ्यस्फोट मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
जयंत पाटील म्हणाले, ‘भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस जाण्याची शक्यता नाही. आता ही वक्तव्य केली जात आहेत. उलट उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिली’.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची रुग्णालयात भेट घेतली. या भेटीवर ‘दोघांचे वैयक्तिक संबंध होते. यात राजकारण आणण्याची गरज नाही’, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले.