मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंथन शिबिर सुरू आहे. या शिबिरात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकत्यांना संबोधित केले. यावेळी सुळे यांनी ‘यूपीए, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रामाला विसरले म्हणून हरले’ या विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आपण रामाला कधीच विसरलो नाही. राम हा आपल्या मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. राम-कृष्ण हरी म्हटल्याशिवाय राज्यात कोणाचीही सकाळ सुरू होत नाही. त्यामुळे काही मुद्दा नाही म्हणून विरोधक राम विसरले असे बोलत असतील’ पण, ‘आपण रामाला विसरलो म्हणून निवडणूक हरलो नाही. तर आपण निवडणूक देशात २ जी घोटाळा, कोळसा घोटाळा झाला, त्यामुळे देशात यूपीए सरकारची बदनामी झाली. त्यामुळे निवडणूक हरलो, असे सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले.
