मुंबई: शिवसेनेतून बंड केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी यांनी शपथ घेतली. दरम्यान, मुख्यमंत्रीपद मिळणार हे तुम्हाला आधीपासूनच ठाऊक होतं का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हसून उत्तर दिले?
शिंदे म्हणाले, ‘मी आधी सुद्धा सांगितलं आहे, की काही मिळवण्यासाठी किंवा पदासाठी हे पाऊल उचललं नाही. आमचे आमदार फार चिंतेत, रागात आणि नाराज होते की ते पाहून मी हे पाऊल उचललं’, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘मी जी हिम्मत दाखवली, जे पाऊल (बंडाचं) उचललं आहे ते छोटं पाऊल नाही. या गोष्टी पाहून त्यांनी विचार केला असेल हा हिंमत असणारा माणूस आहे. हा लढाऊ वृत्तीचा माणूस आहे. या व्यक्तीला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवावं असं त्यांना वाटलं असेल,’ असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.