Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, शनिवार ५ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 629

मेष:-
गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील. स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडवीत. कामे सुरळीत पार पडतील. हाताखालील लोक चांगले भेटतील. विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस.

 

 

Jawale Jewellers

वृषभ:-
मित्रांशी सुसंवाद साधावा. संभ्रमित राहू नका. कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल. प्रेमातील गैरसमज दूर करावेत. घरगुती कामासाठी वेळ काढावा.

Manganga

 

मिथुन:-
लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. नवीन गोष्टी आत्मसात कराल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. चिकाटी सोडू नका.

 

कर्क:-
दिवस दगदगीत जाईल. घरगुती अडचणींवर तोडगा काढाल. नातेवाईक भेटीला येतील. घरगुती कामाची धांदल राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते.

 

सिंह:-
सामाजिक प्रतिमा सुधारेल. नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. मुलांचा अभिमान वाटेल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील. दिवस चांगला जाईल.

 

कन्या:-
हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील. आवक चांगली राहिली तरी खर्च आटोक्यात ठेवावा. जबाबदारीची जाणीव ठेऊन वागावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल.

 

तूळ:-
चिकाटी सोडून चालणार नाही. कामाचा उत्साह वाढेल. चटकन निराश होऊ नका. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. दिवस धावपळीत जाईल.

 

वृश्चिक:-
रागावर नियंत्रण ठेवावे. मनाचे सामर्थ्य वाढवावे. नातेवाईकांना मदत कराल. झोपेची तक्रार जाणवेल. जवळच्या व्यक्तिपाशी मन मोकळे करावे.

 

धनू:-
कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी. कामाचा पसारा आवरता ठेवावा. ध्यानधारणेत मन रमवा. खात्री केल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. अति अपेक्षा बाळगू नका.

 

मकर:-
कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील. अतिरिक्त काम अंगावर घेऊ नका. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. वेळ आणि काम यांचे नियोजन करावे. इतरांना मदत करण्यात समाधान मनाल.

 

कुंभ:-
तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. तूर्तास कोणत्याही निर्णयाची घाई करू नका. अधिकारी लोकांची गाठ पडेल. लहान प्रवास घडतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल.

 

मीन:-
एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. जोडीदाराशी वाद वाढवू नका. सबुरीने व शांततेने निर्णय घ्यावा. वैवाहिक जीवनात ताळमेळ साधावा लागेल. अचानक धनलाभ संभवतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.