कोल्हापूरः निवडणूक आयोगाने नुकतेच गुजरातसह दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही सगळ्या निवडणुका या युद्ध म्हणून बघतो त्यामुळे होणाऱ्या निवडणुका या आमच्यासाठी नवीन नसल्याचेही त्यांनी सांगितले, निवडणुका कोणत्याही असल्या तरी भाजपचे नेते हे एकत्रितपणे लढतात. त्यामुळेच भाजपचा विजय होतो हेही त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले.
तसेच, गुजरातमध्येच नाही तर देशात कुठंही निवडणूक असेल त्या ठिकाणी आम्ही सगळे मिळून लढतो.ज्या प्रमाणे गुजरात आमच्यासाठी महत्वाचा आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश या ठिकाणीदेखील आम्ही सर्व नेते मिळून एकत्रच लढतो असंही त्यांनी भाष्य केले.