मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
माहितीनुसार, शरद पवार यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात थांबावं लागलं आहे. राष्ट्रवादीच्या शिबीरलाही ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपली उपस्थिती दर्शवली आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे.