Latest Marathi News

BREAKING NEWS

“…..पण याच तीन महिन्यांच्या बाळाने तुमची झोप उडवली”: ‘यांचा’ गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा!

0 332

जळगावात : मुक्ताईनगर महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांची सभा होणार होती. मात्र पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली आहे. यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सुषमा अंधारे थांबलेल्या हॉटेलमध्ये साध्या वेशात पोलीस उपस्थित आहेत. त्यामुळे सुषमा अंधारे पोलिसांच्या नजरेकैदेत आहेत का? असा सवालही उपस्थित होत होता.

 

सुषमा अंधारे या संपूर्ण प्रकाराबद्दल म्हटलं की, आम्ही जनतेच्या हिताचे जे प्रश्न विचारत आहोत, त्याची उत्तरे सरकारकडे नाहीत. मात्र माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र तुम्ही किती वेळा माझा आवाज दाबाल. किती वेळा पोलीस स्टेशनला घेऊन जाल. मी प्रश्न विचारतेय पण उत्तरं देण्याऐवजी आवाज दाबताय. गुलाबराव पाटील पालकमंत्री म्हणून सत्तेचा गैरवापर करत आहेत. एकीकडे मी शिवसेनेतील तीन महिन्याचं बाळ म्हणताय. पण याच तीन महिन्याच्या बाळाने तुमची झोप उडवली आहे. तुम्ही घाबरला आहात, असे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले आहे.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!