मुंबई: शिंदे फडणवीस सरकारमध्ये काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. या आमदारांच्या नाराजीच्या चर्चेला आता पूर्णविराम लागणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. हा असा विस्तार असणार आहे, की, यात कोणीही नाराज राहणार नाही.
दरम्यान, याबाबत शिंदे-फडणवीस सरकार विशेष काळजी घेणार आहे. हिवाळी अधिवेशनात सर्व मंत्रिमंडळ सहभागी होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. (सौ. साम)
