Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदे-फडणवीस सरकारला मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई न करण्याचे आदेश!

0 240

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने आज, शुक्रवारी शिंदे-फडणवीस सरकारला मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांनी मराठीत पाट्या लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते.

 

Jawale Jewellers

कोर्टाने आज फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स असोसिएशन वेलफेअर्सला दिलासा दिला आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत मराठीत पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई न करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत.

Manganga

 

यासंदर्भात सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. तोपर्यंत कुठलीही जबरदस्तीची कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

 

दरम्यान, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स असोसिएशन वेलफेअर्सने या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.