Latest Marathi News

BREAKING NEWS

मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासाठी ‘आप’कडून यांचे नाव जाहीर: अरविंद केजरीवाल!

0 97

गुजरात: गुजरातमध्ये ईशुदान गढवी ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. गढवी हे पक्षाचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव आहेत. गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी येत्या १ आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

 

Jawale Jewellers

यंदाच्या निवडणूकीत गुजरातमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पक्षही मैदानात उतरला आहे. आज आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री पदासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. दरम्यान, या संदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मोबाईल क्रमांक देऊन जनतेच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या. त्यानुसार आज आपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून ईशुदान गढवी यांची निवड करण्यात आली आहे.

Manganga

 

दरम्यान, मुख्यमंत्री पदासाठी निवड झाल्यानंतर ईशुदान गढवी यांनी जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे आभार मानले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.