Latest Marathi News

BREAKING NEWS

…..म्हणून औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली!

0 246

 

Jawale Jewellers

औरंगाबाद : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या सभेत सिल्लोड नगरपरिषदेने परवानगी नाकारली आहे. येत्या 7 नोव्हेंबर रोजी सिल्लोड शहरातील महावीर चौकात आदित्य ठाकरे यांची सभा होणार होते. खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील याच परिसरात सभा होणार आहे. त्यांच्या सभेला मात्र परवानगी मिळाली आहे.

 

Manganga

माहितीनुसार, दोन्ही सभा आमने सामने होणार असल्यामुळे सिल्लोड नगर परिषदेने ही परवानगी नाकारली आहे. श्रीकांत शिंदे यांची सभा झेडपी ग्राउंडवर तर आदित्य ठाकरे यांची सभा महावीर चौकात होणार होती.

 

 

दरम्यान, श्रीकांत शिंदेंची सभा अब्दुल सत्तार यांनी नियोजित केली आहे. दोन्ही सभा जवळ होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आदित्य ठाकरे यांना परवानगी नाकारली आहे. मात्र जाणूनबुजून आदित्य ठाकरे यांच्या सभेला आडकाठी केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.