Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदे-भाजप सरकार पडणार? शहाजीबापूचे मोठे प्रत्युत्तर!

0 851

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डी येथील अधिवेशन संपल्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपची युती असलेलं सरकार पडणार असल्याचे भाकित जयंत पाटील यांनी केलं. यावर एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

Jawale Jewellers

शहाजी बापू पाटील म्हणाले, ‘ अशी भाकितं यापूर्वीही झाली आहेत. 1995 साली मी काँग्रेसचा आमदार होतो. त्यावेळी 5 वर्ष पवारसाहेब सांगायचे. सरकार पडणार. पण मनोहर जोशी आणि राणे साहेबांचं सरकार काही केल्या पडलं नाही. आम्हाला निवडणुकीला सामोरे जावे लागले. आताही सरकार पडणार पडणार म्हणतायत..

Manganga

 

भाजप-शिंदेंकडे एकामागून एक लोक जातायत, त्यांना भीती दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशी वक्तव्य करतायत, असं वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी केलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.