Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी बाजार समिती येथे भरणाऱ्या शेळ्या-मेंढ्याच्या कार्तिक यात्रा व आठवडी बाजाराला विरोध : अरुण बालटे

0 1,278

 माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी येथे सालाबादप्रमाणे कार्तिकी पोर्णिमे निमित्त भरणारी शेळ्यामेढ्यांची यात्रा कृषि उत्पन्न बाजार समिती आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख मार्केट यार्ड येथे सोमवार दिनांक ७/११/२०२२ ते बुधवार दि. ०९/११/२०२२ अखेर भरणार आहे. तसेच शेळ्यामेंढ्या चा नियमित भरणारा आठवडा बाजार मार्केट यार्ड येथेच भरणार आहे. परंतु याला आटपाडी येथील व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने यात्रा व आठवडी बाजार आटपाडी बाजार पटांगण येथे भरविण्यात यावा अशी मागणी माजी जि.प. सदस्य अरुण बालटे यांनी केली आहे.

Jawale Jewellers

आटपाडी येथे सोमवार दि. ७/११/२०२२ ते बुधवार दि. ०९/११/२०२२ अखेर कार्तिक तसेच शेळ्या-मेंढ्याची यात्रा भरणार आहे. परंतु आटपाडी बाजार समितीने सदरची यात्रा ही आटपाडी बाजार समितीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख मार्केट यार्ड येथे भरणार असल्याचे प्रशासक वैभव हजारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

Manganga

आटपाडी बाजार पटांगण तसेच मेन व्यापारी पेठेतील व्यापारी कोरोनामुळे गेली दोन वर्ष झाले आर्थिक तोट्यात आहेत. तर काही व्यापारी यांनी दुकाने बंद करण्याची वेळी आली आहे. आटपाडी शहरामध्ये भरणाऱ्या कार्तिक यात्रेमुळे काही प्रमाणात व्यापाऱ्यांची आर्थिक भरभराट होणार असून तोट्यातून बाहेर निघण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सदरची कार्तिकी यात्रा व शेळ्या-मेंढ्याचा आठवडी बाजार हा आटपाडी बाजार पटांगण या ठिकाणी भरविण्यात यावा अशी व्यापारी वर्गाची मागणी असून बाजार समितीच्या प्रशासकांनी या मागणीकडे लक्ष द्यावे व आठवडी बाजार व यात्रा बाजार पटांगण येथेच भरविण्यात यावी अशी मागणी माजी जि.प. सदस्य अरुण बालटे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.