भिडेंना कृपामाईमध्ये अडमिट करणे हे महाराष्ट्राच्या आणि भिडेंच्या दृष्टीनेही हिताचे ठरेल : श्रीमंत कोकाटे
पुणे : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महिलेला पत्रकाराला उद्देशून केलेल्या वक्तव्याचा समाजातील विविध स्तरातून निषेध व्यक्त असून “भिडेंना कृपामाईमध्ये अडमिट करणे हे महाराष्ट्राच्या आणि भिडेंच्या दृष्टीनेही हिताचे ठरेल” अशी प्रतिक्रिया संभाजी बिग्रेडचे श्रीमंत कोकाटे यांनी दिली आहे.
संभाजी भिडे हे काही कामानिमित्त मंत्रालयात गेले होते. यावेळी साम टीव्ही या मराठी वृत्त वाहिनीच्या महिला पत्रकाराने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो, असे म्हणत त्यांनी त्यांचा अपमान केला. भिडे गुरूजी मंत्रालयात आले असता गुरूजी आज तुम्ही मंत्रालयात आला आहात. आज आपण कुणाची भेट घेतली, असे महिला पत्रकाराने विचारताच, ‘आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलीन’, असे भिडे गुरूजी महिला पत्रकाराला म्हणाले.

त्यांच्या कुंकू लाव या वक्तव्यांनंतर त्यांच्यावर चौफेर टीका होत असून संभाजी बिग्रेडचे प्रा. श्रीमंत कोकाटे यांनी देखील त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला असून “भिडेंना कृपामाईमध्ये अडमिट करणे हे महाराष्ट्राच्या आणि भिडेंच्या दृष्टीनेही हिताचे ठरेल” असे ते म्हणाले आहेत. तर महिला आयोगा कडून देखील त्यांना महिलांच्या अपमान केल्याबद्दल नोटीस पाठविण्यात आली असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
भिडेंना कृपामाईमध्ये अडमिट करणे हे महाराष्ट्राच्या आणि भिडेंच्या दृष्टीनेही हिताचे ठरेल! pic.twitter.com/QTzrnnRH1T
— Dr.Shrimant Kokate (@KokateShrimant) November 3, 2022