सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोग-पुर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू : “या” केंद्रावर होणार परीक्षा
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 5 नोंव्हेबर रोजी सांगली व मिरज येथील 19 परीक्षा केंद्रावर गट-क पदासाठी पुर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या इमारतीपासून 100 मीटरच्या सभोवतालच्या परिसरात दि. 05 नोव्हेंबर 2022 रोजीचे सकाळी 7.30 ते दुपारी 2.00 वाजपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे.
या कलमानुसार परीक्षा केंद्राच्या ठिकाणी परिक्षेसंबंधित अधिकारी /कर्मचारी व परिक्षेस बसणारे विद्यार्थी वगळता दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. वरील नमूद वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परीक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे.हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग – राज्यसेवा पुर्व परीक्षा-2021 ची परीक्षा केंद्रे – शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे मिरज पंढरपूर रोड, मिरज, सिटी हायस्कूल गावभाग सांगली, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, विश्रामबाग, सांगली, श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल, दक्षिण शिवाजीनगर, गुलमोहर कॉलनी सांगली, व्ही. पी. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, स्टडी ॲन्ड रिसर्च, वान्लेसवाडी, सांगली, संजय भोकरे ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज, टिळकनगर, वान्लेसवाडी, मिरज, सांगली हायस्कूल सांगली आमराई जवळ महावीरनगर सांगली, मोहंमदियाँ ऍग्लो उर्दू हायस्कूल, जिल्हा परिषद जवळ, सांगली, श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील, गर्ल्स हायस्कूल नेमीनाथ नगर, सांगली, विलींग्डन कॉलेज विश्रामबाग सांगली, राणी सरस्वतीदेवी कन्याशाळा, पेठभाग, सांगली, श्रीमती चंपाबेन बालचंद शहा महिला महाविद्यालय, आमराई जवळ,सांगली, जी. ए. हायस्कूल हरभट रोड सांगली, चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, विश्रामबाग, सांगली,गणपतराव आरवडे कॉलेज ऑफ कॉमर्स, उत्तर शिवाजीनगर, सांगली, न्यू इंग्लिश स्कूल सेंकडरी, पंढरपूर रोड मिरज, वानलेसवाडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, वानलेसवाडी सांगली, कै. ग.रा.पुरोहित कन्या शाळा, राजवाडा सांगली, हि.हा.रा.चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल गणेश दुर्ग, राजवाडा परिसर सांगली.