मेष : सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट व मित्रांसह वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. सरकारी व निम-सरकारी कामात यश मिळेल. दांपत्य जीवनात सुख मिळेल व सुसंवाद राहील. प्राप्तीचे नवीन स्त्रोत प्राप्त होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ : आजचा दिवस नवीन कामाचे नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नोकरी – व्यवसायात लाभदायी परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील. मान – प्रतिष्ठा वाढेल. अडलेली कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील.
मिथुन : मानसिक दृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था व कटकटीचा राहील. शरीराने थकाल व आळसामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटदुखीचा त्रास संभवतो. पैसा खर्च होईल. व्यवसायात अडचणी येतील. सहकारी सहकार्य करणार नाहीत. संततीची काळजी राहील. राजकीय अडचणी त्रास देतील.
कर्क : आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैवाहिक जीवनात वाद होतील. तसेच व्यापारात भागीदारां बरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. सरकारी कामात विघ्ने येतील. कुटुंबात भांडणे होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल.
सिंह : आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नोकरी – व्यवसायात मतभेद होण्याची शक्यता आहे. आपली प्रकृती उत्तम राहील. सामाजिक जीवनात यश मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास घडेल. मात्र ह्या सहवासाचा त्रास होण्याचं शक्यता असल्याने सावध राहावे.
कन्या : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात सुख शांतीचे वातावरण राहिल्यामुळे मन ही प्रसन्न राहील. काही सुखद प्रसंग घडतील. प्रकृती उत्तम राहील. रुग्णांची तब्बेत सुधारेल. आर्थिक लाभ होतील तसेच यशही मिळेल. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल.
तूळ : आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल. बौद्धिक कामे व चर्चेत दिवस घालवू शकाल. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्तीचा उपयोग आपण करू शकाल. संतती कडून काही चांगली बातमी मिळेल. आपली प्रगती होईल. स्त्रियांकडून सहकार्य मिळेल.
वृश्चिक : आजचा दिवस आपण शांतपणे घालवाल. शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याने आपण मानसिक दृष्टया बेचैन राहाल. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मनास यातना होतील. स्त्री वर्गाकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. जलाशयापासून भीती राहील.
धनु : आज एखाद्या गूढ व रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण होईल. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र व आप्तेष्टांच्या आगमनाने घरात आनंद राहील. हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. जवळचा प्रवास घडेल. धनलाभ संभवतो. प्रिय व्यक्तीचा सहवास घडू शकेल.
मकर : वाणीवर ताबा ठेवला तर अनर्थ घडणार नाही. कुटुंबियांशी मतभेद होऊ नयेत म्हणून ह्याची आवश्यकता आहे. विद्यार्थिवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. स्वास्थ्य साधारण राहील.
कुंभ : आजचा दिवस शारीरिक, मानसिक व आर्थिक अशा सर्व दृष्टीनी चांगला आहे. कुटुंबीयांसह रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल. दांपत्य जीवनातील आनंद उपभोगू शकाल. भेटवस्तूंची प्राप्ती व धनप्राप्ती होईल.
मीन : कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा व पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. स्वकीयां पासून दूर जाण्याचे प्रसंग येतील. परोपकारी कार्यावर खर्च होईल. आजचा दिवस आर्थिक देवाण – घेवाणीसाठी अनुकूल नाही.