मुंबईः बच्चू कडू यांनी थोडा तरी स्वाभिमान जिवंत ठेवावा असा सल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात यांनी दिला आहे.
सचिन खरात म्हणाले, ‘ रवी राणा यांनी घरात येऊन मारहाणीची भाषा केली आहे. माझा निर्णय कार्यकर्ता घेत असतो. त्यासाठी सभा घेणार म्हणाले..1 तारखेला ट्रेलर, 15 दिवसांनी पिक्चर दाखवणार आहेत. ट्रेलर फ्लॉप झाला आहे. बच्चू कडू यांनी थोडा तरी स्वाभिमान जिवंत ठेवावा असा टोमणा सचिन खरात यांनी लगावला आहे.

तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं. मी एक फोन केला आणि बच्चू कडू गुवाहटीला आले…. या वक्तव्याला बच्चू कडू यांनी उत्तर दिलेच नाही, असे वक्तव्य करत यांनी बच्चू कडू यांच्यावर निशाना साधला आहे.