लाहौर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. इम्रान खान यांच्या ताफ्यावर गोळीबार झाला. या गोळीबारातून इम्रान खान जखमी झाले आहेत. संबंधित घटना ही गुजराँवाला येथे घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

माहितीनुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाला. या गोळीबारात इम्रान खान जखमी झाले आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त इतर चार जणही जखमी झाले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे, असे वृत्त आहे. इम्रान खान यांना जखमी अवस्थेत नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.