नागपूर : राज्यातील मोठे प्रकल्प बाहेर गेल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. टाटा एअरबस प्रकल्प यापैकीच एक होता. टाटा एअरबस प्रकल्प नागपूरमध्ये व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आग्रही होते. टाटाचा मोठा प्रोजेक्ट बाहेर गेल्याने रोजगाराला मोठा फटका बसला आहे. मात्र टाटाचा प्रोजेक्ट नागपूरच्या मिहानमध्ये आणणार असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

गडकरी यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षांना टाटाचा प्रकल्प मिहानमध्ये आणावा यासाठी पत्र लिहलं होतं. त्यानंतर टाटाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी गडकरी यांना पत्र लिहून सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे एकीकडे मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात असताना रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही नक्कीच दिलासादायक माहिती आहे.
दरम्यान, गडकरी यांनी ऑफ द रेकॉर्ड ही माहिती दिली आहे. नागपूर विमानतळावर आल्यावर बाईट देण्यास त्यांनी नकार दिला, मात्र अनौपचारीक बोलताना त्यांही ही माहिती दिली.