मुंबई: प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आता भाजप आणि शिंदे गटालाही धक्का देण्याच्या तयारी आहेत. आमची बांधिलकी शिंदे गट आणि भाजपशी आहे. पण येणाऱ्या निवडणुकीत आमची युती कुणाशीही होऊ शकते, असं मोठं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.

यावेळी बच्चू कडू म्हणाले, “आतापासून जागा निवडणार नाही. आम्ही सहा महिने अभ्यास करतोय.10 ते 15 जागांवर आम्ही लढण्याच्या तयारीत आहोत. आम्ही लढणार याची भीती भाजपलाच नाही, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही असू शकते.
तसेच, आमची युतीही होऊ शकते. आमची कुणाही सोबत युती होऊ शकते. हे कुठे स्थिर राहतील का? पाच वर्षाचं राजकारण पाहिलं तर सत्तेत कोणता पक्ष नव्हता असं काही सांगता येत नाही. सर्व पक्ष सत्तेत येऊन गेले. एकही पक्ष विरोधात राहिला नाही, असे त्यांनी सांगितले.