मुंबई : महाराष्ट्रात केंद्र सरकारने सुमारे दोन लाख कोटींहून अधिक किमतीचे सुमारे 225 प्रकल्प मंजूर केले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते आज राज्य सरकारने आयोजित केलेल्या महाराष्ट्र रोजगार मेळाव्यात बोलत होते.
महाराष्ट्रात केंद्र सरकारने सुमारे दोन लाख कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्प मंजूर केले आहेत. या प्रकल्पांचे काम एकतर सुरू आहे किंवा लवकरच सुरू होणार आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी 75 हजार कोटी रुपये आणि आधुनिक रस्त्यांसाठी 50 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. जेव्हा सरकार पायाभूत सुविधांवर एवढी मोठी रक्कम खर्च करते, तेव्हा त्यातून लाखो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात, असे नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या गृह विभागात हजारो पोलिस कॉन्स्टेबलची भरती केली जाईल आणि ग्रामीण विकास विभागातही भरती मोहीम राबवली जाणार आहे याची माहितीही पंतप्रधान मोदींनी दिली.