Latest Marathi News

BREAKING NEWS

कार झाडाला धडकल्याने अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

0 448

 

Jawale Jewellers

वर्धा : वर्धा ते आर्वी मार्गावरील कामठी शिवारात भरधाव कार झाडाला धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

 

Manganga

याबद्दल अधिक माहिती अशी कि, आंजी येथील प्रज्वल डंभारे आणि राहूल धोंगडे हे दोघे कारने गावी जात होते. दरम्यान कामठी शिवारात हा अपघात घडला. कारची धडक इतकी जोरात होती की, गाडीचा चुराडा झाला आहे. यामुळे गाडीतील दोघांना बाहेर निघता आले नाही. यामुळे कारचे पत्रे गॅस कटरने कापून दोघांनाही बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

 

दरम्यान, सदर घटनेचा तपास पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.