Latest Marathi News

BREAKING NEWS

रवी राणा यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांची मोठी प्रतिक्रिया!

0 490

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांचे प्रकरण मिटले असे वाटत असतानाच पुन्हा एकदा रवी राणा यांच्या एका व्यक्तव्यामुळे वाद वाढण्याची चिन्हे आहेत. मात्र रवी राणा यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी सौम्य भूमिका घेतल्याचे पहायला मिळत आहे. बच्चू कडू आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. ते भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

 

Jawale Jewellers

दरम्यान, राणांचे वक्तव्य साधारण आहे, मला वाद वाढवायचा नाही. मतदारसंघाला निधी दिल्यानं आभार माणण्यासाठी फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Manganga

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.