Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, गुरुवार ३ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 687

 

Jawale Jewellers

मेष:-
दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. आपल्या हातून चांगले काम घडेल. काही प्रसंगामूळे चिडचिड होऊ शकते. मानसिक अस्वस्थता जाणवू देऊ नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक परिस्थिति आहे.

 

 

Manganga

वृषभ:-
ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. संगीताचा, कलेचा आनंद घेऊ शकता. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. वातावरण आनंदी व उत्साही राहील.

 

मिथुन:-
हास्य-विनोदात दिवस जाईल. घरात वेगवेगळी कामे निघतील. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत सुस्थता लाभेल.

 

कर्क:-
एखादे चांगले साहित्य वाचनात येईल. शोधत असलेले काम पूर्ण होईल. मित्रांमुळे निराशा समाप्त होईल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. भेटवस्तू मिळण्याचे संकेत.

 

सिंह:-
आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. बोलण्यात अत्यंत मधुरता ठेवाल. मनोबल वाढीस लागेल. सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल.

 

कन्या:-
काही जुने मतभेद मिटू शकतील. आपल्या कर्तुत्वाने कार्य सिद्धीस न्याल. मिळकतीत वाढ संभवते. मुद्दा मांडताना गाफिल राहू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो.

 

तूळ:-
थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. बरेच दिवस राहून गेलेला प्रवास कराल. अचानक खर्चात वाढ होऊ शकते. एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते. कामाची दगदग राहील.

 

वृश्चिक:-
जुनी कामे पूर्णत्वास जातील. गोष्टी मनाप्रमाणे घडतील. तज्ञ व्यक्तींचे सहकार्य मिळेल. जुनी उधारी वसूल होईल. पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल.

 

 

धनू:-
दूरच्या नातेवाईकांशी गप्पा माराल. कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद संभवतात. व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल. बोलताना तारतम्य बाळगा. कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील.

 

मकर:-
दानधर्म कराल. घरात अनावश्यक खर्च निघेल. प्रवासात काळजी घ्यावी. विरोधक नामोहरम होतील. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल.

 

कुंभ:-
आलेल्या संधीचा लाभ उठवा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.

 

मीन:-
जवळच्या मित्रांशी भेट शक्य. नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. डागडुजीवर खर्च होऊ शकतो. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धर्म-कार्यात आस्था वाढेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.