मुंबई: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंपुढे मोठं संकट उभ ठाकलं आहे. या संकटात आमदार आदित्य ठाकरे पक्षाची मोठी कमान सांभाळत आहेत.दरम्यान, पाच नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे-उद्धव ठाकरे दोन्ही पिता-पुत्र एकत्र पत्रकार परिषद घेणार आहे.
माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदा एकत्र पत्रकार परिषद घेणार आहे. पाच नोव्हेंबर रोजी महत्वाच्या विषयावर आदित्य-उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या अनुषंगाने मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिन १७ नोव्हेंबर रोजी आहे. याच पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या इतिहासात पिता-पुत्र पहिल्यांदा एकत्र पत्रकार परिषदेत संबोधित करणार आहे. तसेच या परिषदेत दोन्ही पिता-पुत्र काय घोषणा करणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.