मुंबई : राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची फोनवरून चर्चा झाली असता येत्या 20 किंवा 21 नोव्हेंबरला दोन्ही नेते एकत्र येऊन चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना मैत्रीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र शिवसेनेकडून याबाबत कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आली नव्हती. तसेच, प्रकाश आंबेडकरांनी दोन ते तीन वेळा उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, ठाकरे-आंबेडकर यांच्यात युतीबाबत स्पष्टता जाहीर करण्याची शक्यता आहे.