गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा संदर्भात महात्मा गांधी यांची कॉपी करून तत्वाचे भांडवल केले असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. त्याच्या या वक्तव्याचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते गोंदियात बोलत होते.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मानसिक संतुलन बिघड़ले असुन त्यांना औषध उपचाराची गरज आहे, ते प्रसिद्धीसाठी असे करीत आहेत,असा खोचक टोला विखेपाटील यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला.

तसेच ते पुढे म्हणाले, “आदित्य ठाकरे यांनी कोणाला सल्ला देउ नये. मी अंबादास दानवे यांना कोणताही सल्ला देणाऱ नाही. सध्या त्यांचे कोणीही ऐकत नसल्याने दानवे असे वक्तव्य करत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.