Latest Marathi News

BREAKING NEWS

“……तेव्हा महाराष्ट्राची जनता या ४० आमदारांना आपली घर दाखवतील”

0 194

मुंबई: शिवसेना नेता आणि खासदार अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील ४० आमदारांवर जबरी टीका केली आहे.

 

Jawale Jewellers

राज्यात विद्यमान परिस्थितीत खोटेगिरी सुरू असून शेतकऱ्यांवरती अन्याय होत आहे. राज्य सरकारने घोषणा केलेला आनंद शिधा अजूनही मिळतोय, निदान तुळशीच्या लग्नापर्यंत मिळावा, अशी अपेक्षा अरविंद सावंत यांनी व्यक्त केली. तसेच, या ४० आमदारांना गाडण्यासाठी लोक वाट पाहत आहेत, महाराष्ट्रातील जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा महाराष्ट्राची जनता या लोकांना आपली घर दाखवतील, अशा शब्दात सावंत यांनी ४० आमदारांवर टीकास्त्र सोडले.

Manganga

 

 

तसेच, महाराष्ट्रात RTI ऍक्टिव्हीटीला मी खरंच आव्हान करतो, तुम्हाला आरटीआयचं उत्तर हे 24 तासात मिळालं पाहिजे इथे त्यांनी 24 तासाच्या आत दिले आहे, असेही सावंत यांनी वक्तव्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.