Latest Marathi News

BREAKING NEWS

इंस्टाग्रामवरील मैत्रीचे रूपांतर प्रेमात; तरुणीवर अत्याचार करत तिचे फोटो, व्हिडिओ केले व्हायरल!

0 406

 

Jawale Jewellers

बीड : बीडच्या तरुणीची पुण्याच्या तरुणाशी इंस्टाग्रामवर ओळख झाली. यानंतर मैत्री व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या प्रेमातून तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

 

 

Manganga

याबद्दल अधिक माहिती अशी कि, पीडितेचेतिचे इन्स्टावर स्वतःचे अकाउंट आहे. या अँपद्वारे तिची आरोपी शेख शरीफ (रा. सांडस रांजणगाव, जि. पुणे) याच्यावशी 2020 मध्ये ओळख झाली. त्यानंतर ते व्हॉट्सॲपवरूनही (एकमेकांशी बोलत होते. या ओळखीतून त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला पुण्यात बोलावून एका लॉजवर नेत अत्याचार केला.व यानंतर पिडीतेवर अत्याचार करत असताना आरोपीने तिला न कळू देता व्हिडिओ बनवला. तसेच अश्लील फोटोही काढले. त्याआधारे नंतर त्याने ब्लॅकमेलिंग सुरू केली. तर ब्लॅकमेलिंगमधून पैसे निघाले नाहीत; म्हणून आरोपीने पीडितेचे फोटो तिच्या 50 मैत्रिणींना पाठवले आहेत.

 

 

दरम्यान, या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात विनयभंग, बलात्कार, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील आरोपी फरार असून शिवाजीनगर पोलीस तपास करत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.