Latest Marathi News

BREAKING NEWS

डॉक्टरांची चूकीमुळे बाळाचा कापावा लागला हात; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल!

0 397

नालासोपारा : मुंबईच्या नालासोपारा परिसरात एका नवजात बालकावर चुकीचा उपचार केल्याने या बालकाला आपला हात गमवावा लागला आहे. या संदर्भात नालासोपारा पोलीस ठाण्यात वसई विरार महापालिका वैद्यकिय विभाग आणि जिल्हा शल्य चित्किसक अधिकारी यांच्याकडे पालकांच्या वतीने तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

 

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहिती अशी कि, अंजली वाला नामक महिला नालासोपारा येथील त्रिवेणी खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. ५ ऑक्टोबर रोजी या महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, एका बाळाची शुगर कमी असल्याने त्याला सलाईन लावावे लागेल, असे सांगत डॉक्टरांनी त्याला सलाईन लावले. त्यानंतर बाळाचा उजवा हात काळा पडत गेला. याबाबत अंजली वाला यांनी डॉक्टरांना विचारणा केली असता. त्यांनी मालीश करुन जाईल असे सांगितले. तरी सुद्धा बाळाच्या तब्बेतीत काहीच सुधारणा होत नसल्याने पालकांनी बाळाला वाडीया रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी बाळाच्या हाताला गॅंगरिन झाला असल्याचे सांगत बाळाचा हात निकामी झाल्याचे सांगितले. यामुळे या बाळाचा उजवा हात कापण्यात आला.

Manganga

 

 

दरम्यान, नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सुध्दा वैद्यकीय तक्रारीच्या अनुशंगाने पोलीसांना सरळ गुन्हा दाखल करता येत नसून त्यावर जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालाची आवश्यकता असते. यामुळे पालकांचा अर्जावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.