Latest Marathi News

BREAKING NEWS

‘सर्वोत्कृष्ट साहित्यनिर्मिती ‘पुरस्काराने बाळासाहेब कांबळे सन्मानित

दुर्गम जावळी खोऱ्यातील अनाम जगणे सांगणारी 'भिनवाडा' ही सध्या चर्चेत असणारी कादंबरी आहे.

0 211

मायणी : सोलापूर येथील निर्मला मठपती फाउंडेशन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट सहित्य निर्मीती स्पर्धा २०२३ या स्पर्धेत मायणी येथील साहित्यिक बाळासाहेब कांबळे यांच्या ‘भिनवाडा’ या कादंबरीस ज्येष्ठ साहित्यिक योगिराज वाघमारे यांच्या शुभहस्ते ‘सर्वोत्कृष्ट साहित्यनिर्मिती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

Jawale Jewellers

यावेळी प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.श्रुती वडगबाळकर, अध्यक्षा, महाराष्ट्र साहित्य परीषद, सोलापूर, प्रा.डॉ.राजशेखर शिंदे, मराठी विभाग प्रमुख, दयानंद महाविद्यालय सोलापूर, प्रा.डॉ.शिवाजीराव शिंदे उपकुलसचिव अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर, लेखिका मा.वंदना कुलकर्णी, अविनाश मठपती, रूपाली मठपती इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Manganga

या स्पर्धेस यावर्षी महाराष्ट्रासह शेजारी राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला. विविध विभागातील पुस्तकांचे मान्यवर परीक्षकांकडून परिक्षण करून फाउंडेशनच्या अध्यक्षा शिवांजली स्वामी व सचिव उत्तरेश्वर मठपती यांच्यावतीने या स्पर्धांचा निकाल घोषित करण्यात आला होता.

शिवस्मारक शिंदे चौक सोलापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. कांबळे यांनी यापूर्वी असे घडले महापुरुष, म.जोतीराव फुले, रमाई चरित्र अशा पुस्तकांचे लेखन केले असून त्यांचे रमाई चरित्र हे पुस्तक कन्नड भाषेत अनुवादित झाले आहे. त्यांची दुर्गम जावळी खोऱ्यातील अनाम जगणे सांगणारी ‘भिनवाडा’ ही सध्या चर्चेत असणारी कादंबरी असून या साहित्यकृतीची फाउंडेशनच्या वतीने दखल घेऊन सन्मानित केल्याबद्दल लेखक बाळासाहेब कांबळे यांनी लेखनाची जबाबदारी वाढली असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. या पुरस्काराबद्दल त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.