Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, बुधवार २ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 710

मेष:-
निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेऊन वागाल. नातेवाईकांची गाठ पडेल. अति तिखट पदार्थ खाऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

 

 

Jawale Jewellers

वृषभ:-
प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. जुगारात चांगली कमाई करता येऊ शकेल. वाचनातून वैचारिकता सुधारेल. मुलांच्या वागण्याने खुश व्हाल.

Manganga

 

मिथुन:-
तत्काल निर्णयावर येऊ नका. नोकरीत वरचष्मा राहील. सारासार विचारावर भर द्यावा. घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील.

 

कर्क:-
अधिकार्यांयवर छाप पाडता येईल. हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रगती च्या दृष्टीने पाऊल टाकाल. मित्रमंडळींच्या सहवासात रमून जाल.

 

सिंह:-
नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल. आवडीचे पदार्थ चाखाल. हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका.

 

कन्या:-
रुचकर भोजनाचा आनंद घ्याल. मानसिक प्रसन्नता लाभेल. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल. आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल.

 

तूळ:-
पोटाचे विकार जाणवू शकतात. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका. योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. क्षुल्लक समस्या सोडवू शकाल. उगाच फार काळजी करत बसू नका.

 

वृश्चिक:-
साहस आणि पराक्रमात वाढ होईल. लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल. मनातील इच्छा पूर्ण कराल. एखादी बहुमूल्य वस्तु मिळण्याचे संकेत मिळतील. नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल.

 

धनू:-
नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील. सामाजिक कामाची ओढ लागेल. प्रलंबित येणी मिळतील. घरात कामाचा बोजा वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल.

 

मकर:-
व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत. मन:शांती लाभेल. जुन्या चिंता मिटतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल.

 

कुंभ:-
घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. नवीन गुंतवणूक करता येईल. नसत्या भानगडीत अडकू नका. मानसिक स्वास्थ जपावे. उगाचच चिडचिड करू नये.

 

मीन:-
पचनाचा त्रास संभवतो. बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला. अति साहस करायला जाऊ नका. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

 

Leave A Reply

Your email address will not be published.