नागरपूर: नागपुरात मंगळवारी २१ वर्षीय युवकाने ६ व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. हर्ष राजा असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, हर्ष राजा हा २१ वर्षीय युवक नागपुरमधील टाटा कॅपिटल हाईट्स इमारतीत राहायचा. या इमारतीत हर्ष कुटुंबासोबत राहायचा. हर्ष हा नागपुरात ‘सीए’चं शिक्षण घेत होता. २१ वर्षीय हर्ष सीएच्या अभ्यासामुळे तणावात गेला होता. हर्ष अभ्यासाच्या ताणतणावामुळे ‘टाटा कॅपिटल हाईट्स’ या राहत्या इमारतीच्या ६ मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली.
दरम्यान, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.