Latest Marathi News

BREAKING NEWS

तिच्याशी केला प्रेमविवाह, अन् लग्नाच्या पहिल्याच रात्री भयंकर सत्य आले समोर!

0 954

हरिद्वार: उत्तराखंडच्या हरिद्वार येथील एका तरुणाच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हरिद्वारच्या लक्सरमधील रायसी चौकी गावात हा धक्कादायक प्रकार घडला. या गावातील एका तरुणाची सोशल मीडियावर एका मुलीशी मैत्री झाली. या तरुणीच्या नावाने असलेल्या अकाऊंटवरून या तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट गेली.

 

Jawale Jewellers

या तरुणाने ती रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे नंबर दिले. दोघांमध्ये फोनवरून बातचीत होऊ लागली.या तरुणीने ती हरियाणाच्या हिसारमधील असल्याचं या तरुणाला सांगितलं. दोघांच्या गप्पा एवढ्या वाढल्या की दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर या दोघांनी एकत्र राहण्याचा विचार केला. या तरुणाने तरुणीला लग्नाची मागणी घातली. तिला लग्न करण्यासाठी तयार केलं. त्यानंतर लग्नाचंही ठरलं आणि लग्नाची जोरदार तयारीही झाली.ही तरुणी लग्नासाठी लक्सरला आली. त्यानंतर या दोघांनी एका मंदिरात विवाहही केला. लग्नाच्यावेळी या तरुणीच्या घरातील एकही व्यक्ती उपस्थित नव्हता. लग्नानंतर हा तरुणी तिला घेऊन आपल्या गावी घेऊन गेला.

Manganga

 

परंतु, गावाला आल्यावर लग्नाच्या पहिल्या रात्री आपण जिच्याशी लग्न केलं ती स्त्री नसून तृतीयपंथी असल्याचं या तरुणाला कळले आणि त्याला धक्काच बसला.

 

त्यानंतर , तरुणाने या मुलीशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. पण तिने काडीमोड घेण्यासाठी या तरुणाकडे पाच लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे.

 

 

दरम्यान, तरुणाने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरुणाची सर्व काहानी ऐकून पोलीसही हैराण झाले आहेत. या तरुणाने आम्हाला तोंडी तक्रार दिली आहे. पीडित तरुणाने लेखी तक्रार केली तर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधिकारी यशपाल सिंह बिष्ट यांनी सांगितले.(सौ. tv9 मराठी)

Leave A Reply

Your email address will not be published.