Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : दिघंची जवळ दिंडी मध्ये कार घुसली : तीन जखमी : सुदैवाने जीवितहानी नाही

0 1,746

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे कार्तिक वारीसाठी निघालेल्या दिंडीमध्ये कार घुसल्याने चार वारकरी जखमी झाले आहेत.

 

Jawale Jewellers

याबाबत सविस्तर माहिती अशी, पंढरपूर कार्तिक एकादशी साठी वारकऱ्यांची दिंडी निघाली होती. सदरची दिंडी ही झरे ते दिघंची जाणारे रोड वर दिघंची गावचे हद्दीत, हनुमान स्टील ट्रेडर्स नावाचे दुकानापासून पश्चिमेस 100 मीटर अंतरावर, आली असता सदर दिंडी मध्ये स्विफ्ट डिझायर नंबर (AP –DM-9722) कार घुसली. यामध्ये भिमराव पांडुरंग जाधव (वय 75 वर्ष) धनाजी राजाराम मोहिते (वय 40 वर्ष) शिवाजी मारुती मोहिते (वय 50 वर्ष) सर्व राहणार, मोहिते वडगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली हे वारकरी जखमी झाले आहेत.

Manganga

या प्रकरणी आरोपी ड्रायव्हर भानुदास दशरथ थोरात (वय 52 वर्ष रा., रहाटणी तालुका खटाव, जिल्हा सातारा) याच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. •

Leave A Reply

Your email address will not be published.