Latest Marathi News

BREAKING NEWS

बच्चू कडू यांच्या भाषणानंतर रवी राणा यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले बच्चू कडू यांनी….!

0 690

 

Jawale Jewellers

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मी माझी भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. बच्चू कडू यांनी माझे आभारही मानले आहेत. आमच्यातला वाद मिटला आहे. विषय संपवून पुढे जायला हवं. लोकशाहीत असं घडत असतं. शेतकऱ्यांचे, बेरोजगारांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आता काम करायचं आहे. हा वाद आता संपला आहे, अशी रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

Manganga

तसेच ते पुढे म्हणाले, “मी सर्वसामान्यांना मदत करतो, अपंगाना मदत करतो, माजी सैनिकांना मदत करतो. माझा पगार देखील माजी सैनिकांसाठी घर बांधून देण्यासाठी खर्च करतो. गोरगरिबांना न्याय देण्यासाठी मी काम करतो. म्हणून जनता माझ्यासोबत आहे, त्यांनी वक्तव्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.