Latest Marathi News

BREAKING NEWS

“….तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही,सत्ता गेली चुलीत ”: ‘यांचा’ विरोधकांना इशारा!

0 515

 

Jawale Jewellers

अमरावती : रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेतल्यानंतर बच्चू कडू यांनीही नरमाईची भूमिका घेतली. मात्र प्रहारच्या मेळाव्यात आमदार बच्चू कडू यांनी विरोधकांना इशारा झाला.

 

Manganga

आमदार बच्चू कडू म्हणाले, “आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही आणि गेलं तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. विनाकारण तोंड मारू नका. सत्ता गेली चुलीत. आम्हाला काही पर्वा नाही, आम्ही रक्ताचं पाणी केलं ते राजकारणासाठी नाही केलं. दिव्यांगासाठी आम्ही काम केलं. आम्ही उगाच गुवाहाटीला गेलो नाही. मंत्री होतोच की, मग शिंदे गटासोबत जाण्याची गरज काय होती. परंतु सत्ता वंचित घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सत्तेसोबत जावं लागलं, असे बच्चू कडू यांनी वक्तव्य केले.

दरम्रयान, वी राणा यांच्याशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बच्चू यांनी आज अमरावतीत जोरदार मेळावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.