Latest Marathi News

BREAKING NEWS

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एण्ट्री!

0 344

मुंबई: स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने ६ वर्षांचा लीप घेतला आहे. लीपनंतर कथानकात बरेच बदल झाले आहेत. जयदीप गौरी एकमेकांपासून दुरावले असून या दोघांची लाडकी लेक म्हणजेच लक्ष्मी जयदीपसोबत वेगळ्या शहरात रहात आहे. तसेच आता या मालिकेत लवकरच नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे.

 

Jawale Jewellers

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत रुही कारखानीस या नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. अभिनेत्री गायत्री दातार ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

Manganga

 

दरम्यान, सुख म्हणजे नक्की काय असतंच्या कुटुंबात सामील होताना अतिशय आनंद होत असल्याची भावना गायत्रीने व्यक्त केली. रुही कारखानीसच्या येण्याने मालिकेत नेमकं काय वळण येणार हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.