Latest Marathi News

BREAKING NEWS

“राज्यातील सगळ्याच लोकप्रतिनिधींना देण्यात आलेलं अनावश्यक पोलीस संरक्षण काढून घ्यावे”

0 209

बदलापूरः भाजपचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी गृहविभागाला एक पत्र पाठवले आहे. त्यात स्वतःची सुरक्षा व्यवस्था काढून टाकण्याची मागणी केली आहे. राज्यातील सगळ्याच लोकप्रतिनिधींना देण्यात आलेलं अनावश्यक पोलीस संरक्षण काढून घ्यावे, अशी मागणी यांनी केली आहे.

 

Jawale Jewellers

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराला एक पोलीस उपनिरीक्षक आणि पाच पोलीस कर्मचारी, असं संरक्षण देण्यात आलं आहे. दोन शिफ्टमध्ये देण्यात येणाऱ्या या संरक्षणासाठी प्रत्येक आमदारामागे 12 पोलीस कर्मचारी अनावश्यकरीत्या व्यस्त झाले आहेत.

Manganga

 

त्यामुळे पोलीस दलावर मात्र आधीच कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असताना अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना देण्यात आलेलं अनावश्यक पोलीस संरक्षण काढून घ्यावं, अशी मागणी भाजपचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. तसेच ही मागणी फक्त आमदार किंवा खासदार यांच्याच बाबतीत नव्हे, तर ज्यांना ज्यांना आवश्यकता नसताना पोलीस संरक्षण दिले आहे, त्या सर्वांचेच पोलीस संरक्षण काढून घ्यावे अशी ही मागणी असल्याचेही किसन कथोरे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.