तिरुवअनंतपुरम : केरळमधील तिरुवअनंतपुरम येथे वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या गर्लफ्रेंडनेच बॉयफ्रेंडची हत्या केली.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, २३ वर्षीय तरूण शैरोन राज हा तिरुवअनंतपुरम येथे रेडियोलॉजीचे शिक्षण घेत होता. राज आणि ग्रीष्मा ही गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये होते. यावर्षी फेब्रुवारीत दोघांमध्ये बिनसलं. त्याचवेळी तिचं लग्न अन्य एका तरुणाशी ठरलं होतं. त्यानंतरही दोघांनी नातं कायम ठेवलं होतं. अलीकडेच पुन्हा दोघांमध्ये वाद झाला होता. तिला हे नातं तोडायचं होतं. मात्र, ते राज याला मान्य नव्हते. त्यामुळे तिने १४ ऑक्टोबर रोजी ग्रीष्मा हिने राज याला घरी बोलावून घेतले. तिने घरी द्रवपदार्थात विष मिसळून ठेवले होते. तेच राज याला प्यायला दिले. ते प्यायल्यानंतर राजला उलट्या झाल्या. त्यानंतर तो आपल्या मित्राच्या घरी गेला. त्याच्या हत्येचा कट आधीच आखला होता. राज याचा भाऊ वारंवार ग्रीष्माला फोन करून त्याला काय प्यायला दिलं याबाबत विचारणा करत होता. मात्र, ती काहीच सांगायला तयार नव्हती.

दरम्यान, राज याचा मृत्यू २५ ऑक्टोबर रोजी झाला होता. ३१ ऑक्टोबरला त्याची हत्या झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर २३ वर्षीय तरुणीने सुरुवातीला गुन्ह्याची कबुली दिली नाही. मात्र, आठ तास चौकशी केल्यानंतर पोलिसांसमोर आरोपी तरुणीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर तिला अटक करण्यात आले.