मुंबई: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अकोला उपशहरप्रमुख विशाल कपले यांची भररस्त्यात निर्घृन हत्या करण्यात आली आहे. गजबजलेल्या जठारपेठ चौकात दोघांकडून विशालची चाकू भोसकून हत्या करण्यात आली.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, अकोला शहरातील जठारपेठ भागात असलेल्या गणेश स्वीट मार्ट परिसरात रविवारी सायंकाळी ठाकरे यांच्या शिवसेनेतील उपशहर प्रमुख विशाल रमेश कपले यांच्यावर दोन युवकांनी चाकू हल्ला केला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ विशालला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. चाकू हल्ल्यामध्ये विशाल गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्ला करणाऱ्यांमध्ये दोन जणांचा समावेश असून हे दोघेही मोठी उमरी परिसरातील रहिवासी आहे.

दरम्यान, या घटनेचा अधिक तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत.